Pradeep Pendhare
पेन्शन योजना 2025ची खूप चर्चा असून, भारत सरकारने अलीकडेच कर्मचारी आणि युनिफाइड पेन्शन योजनेत महत्त्वाचे बदल केले आहेत.
पेन्शन योजनेतील बदलांमागे सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अधिक चांगली आर्थिक सुरक्षितता देणे आहे.
पेन्शन योजना 2025 अंतर्गत EPS-95 मध्ये पेन्शनची किमान रक्कम 1 हजारावरून थेट 7 हजार 500 रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे.
या योजना अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूलभूत वेतनाच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे.
EPS-95 पेन्शनसाठी किमान 10 वर्षांची सेवा आवश्यक असून, UPSसाठी 10 वर्षे सेवा आणि 10 हजार रुपये किमान पेन्शनचा निकष असणार आहे.
कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजनेत (NPS) सामील असतील, तर त्यांना UPSमध्ये सामील होण्याचा पर्यायही मिळेल.
EPS-95 अंतर्गत संपूर्ण पेन्शन 58 व्या वर्षी मिळते, परंतु 50 व्या वर्षी कमी रकमेची पेन्शन मिळू शकते.
UPS अंतर्गत पेन्शन निवृत्तीनंतर साधारणतः 60 व्या वर्षी मिळेल. पण 50व्या वर्षी संपूर्ण पेन्शन मिळणे शक्य नाही. मात्र कमी आर्थिक सहाय्य मिळू शकते.