'तेजस'ची गर्जना! भारत-जपान मैत्रीची नवी भरारी! जोधपुरच्या आकाशात रचला इतिहास

Roshan More

तेजसची गर्जना

जोधपुरच्या आकाशात स्वदेशी ‘तेजस’ फायटर जेटने जोरदार गर्जना करत भारत आणि जपानच्या मैत्रीला नवी उंची दिली.

India Japan joint air force exercise Veer Guardian 2026

ऐतिहासिक उड्डाण

भारतीय हवाई दल प्रमुख एपी सिंह आणि जपानचे हवाई दल प्रमुख जनरल ताकेहिरो मोरीता यांनी रविवारी तेजस विमान चालवण्याचा विशेष अनुभव घेतला.

India Japan joint air force exercise Veer Guardian 2026 | sarkarnama

‘वीर गार्जियन २०२६’ युद्धसराव

भारत आणि जपानच्या हवाई दलादरम्यान 'वीर गार्जियन २०२६' हा संयुक्त युद्धाभ्यास सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

India Japan joint air force exercise Veer Guardian 2026 | sarkarnama

युद्धजन्य परिस्थितीचा सराव

या सरावादरम्यान दोन्ही देशांच्या हवाई दलांनी युद्धजन्य परिस्थितीतील मोहिमा आणि एयर स्ट्राईकचे (हवाई हल्ल्यांचे) कठोर प्रशिक्षण घेतले.

India Japan joint air force exercise Veer Guardian 2026 | sarkarnama

जपानी हवाई प्रमुख तेजसच्या प्रेमात

जपानच्या हवाई दलाचे प्रमुख जनरल ताकेहिरो मोरिता यांनी भारताच्या स्वदेशी 'तेजस' विमानाची क्षमता प्रत्यक्ष अनुभवली.

India Japan joint air force exercise Veer Guardian 2026 | sarkarnama

संरक्षण क्षेत्रातील वाढता विश्वास

दोन्ही देशांच्या हवाई प्रमुखांचे तेजसमध्ये उड्डाण करणे, हे भारत आणि जपानमधील मजबूत आणि वाढत्या विश्वासाचे प्रतीक मानले जात आहे.

India Japan joint air force exercise Veer Guardian 2026 | sarkarnama

जपानी लढाऊ विमाने

‘वीर गार्जियन’ सरावाच्या निमित्ताने जपानी हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी पहिल्यांदाच भारतीय भूमीवर अशा सरावात सहभाग घेतला आहे.

India Japan joint air force exercise Veer Guardian 2026 | sarkarnama

आकाशातील थरार

या युद्धाभ्यासात भारताचे तेजस, सुखोई-३० एमकेआय आणि राफेल, तर जपानचे एफ-२ए (F-2A) ही प्रमुख लढाऊ विमाने आमनेसामने आली.

India Japan joint air force exercise Veer Guardian 2026 | sarkarnama

NEXT : UPIनं पेमेंट करण्याआधी 'फी अपडेट'बाबत जाणून घ्या! सर्वसामान्यांना फटका बसणार की नाही?

येथे क्लिक करा