Ganesh Sonawane
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम म्हणू भारतात गॅस सिलिंडरचा भाव वाढला आहे.
युद्ध सुरू झाल्यापासून सरकारने एलपीजी गॅस सिलिंडर वितरणाबाबत एकूण पाच नियमांत बदल केले आहेत.
केंद्र सरकारने 7 मार्च रोजीपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. ही भाववाढ साधारण सात टक्के झाली आहे.
घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली असून ती ८५२.५० रुपयांवरून ९१२.५० रुपये करण्यात आली आहे.
व्यावसायिक सिलिंडरची किंमतही १७२०.५० रुपयांवरून १८३५ रुपये करण्यात आली आहे.
गॅस सिलिंडरच्या बुकिंगच्या नव्या नियमानुसार तुम्ही एक गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर लगेच दुसरा सिलिंडर बुक करू शकत नाही.
एक गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर आता तुम्हाला दुसरा सिलिंडर 25 दिवसांनी बुक करता येणार आहे. ग्रामीण भागात हाच नियम 45 दिवसांचा आहे.
ज्यांच्या घरी पाईप गॅस म्हणजेच पीएनजी असेल तर त्या घरी एलपीजी गॅस ठेवता येणार नाही. म्हणजेच पीएनजी असेल तिथे एलपीजी गॅस मिळणार नाही.
एका कुटुंबाला वर्षाकाठी १५ सिलेंडर बुक करता येतील, ज्यापैकी १२ सबसिडीवर असतील. घरात जास्तीत जास्त २ सिलेंडर ठेऊ शकता.