Pradeep Pendhare
चीनशी घनिष्ठ आर्थिक आणि व्यापारी संबंध असलेल्या मंगोलियाच्या दौऱ्यावर असलेले भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर खास प्लान घेऊन पोहोचले.
मंगोलियाचे राष्ट्रपती उखना खुरेलसुख यांचा गेल्या वर्षी भारत दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेतील निर्णयांची अंमलबजावणीचा आढाव्यासाठी जयशंकर यांचा दौरा होता.
मंगोलियाच्या डोर्नोगोवी प्रांतातील अल्तानशिरी इथं उभारली जाणारी तेल रिफायनरी प्रकल्पासाठी भारत सरकार 1.7 अब्ज अमेरिकन डॉलर्सची सॉफ्ट लाइन ऑफ क्रेडिट उपलब्ध करत आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मंगोलियाची इंधन क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढण्यास मदत होईल आणि दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील, असे जयशंकर यांनी सांगितले.
मंगोलियात तांबे, सोने, कोळसा आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित धातूंचे १ हजारांहून अधिक साठे आहेत. मंगोलियाच्या जीडीपीमध्ये आणि एकूण निर्यातीत खनिजांचा मोठा वाटा आहे.
मंगोलिया आपल्या खनिजांच्या उत्खननासाठी आणि विक्रीसाठी चीनवर पूर्णपणे अवलंबून आहे. भारताने तिथं केलेली गुंतवणूक मंगोलियाला चीनच्या प्रभावातून बाहेर पडण्यास मदत होईल.
भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी युरेनियमचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मंगोलियासोबत करार झाल्यास भारताच्या ऊर्जा सुरक्षेला मोठी ताकद मिळेल.
डॉ. एस. जयशंकर यांचा हा दौरा चीनच्या शेजारी देशांमध्ये आपले आर्थिक आणि धोरणात्मक पाय रोवण्याच्या भारताच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाचा एक भाग आहे.