Pradeep Pendhare
तामिळनाडू सरकारमध्ये बहुमतात बसलेले थलपती विजय यांनी राज्यातील गुंतवणुकीवर आणि त्यातून युवकांच्या रोजगारावर लक्ष केंद्रीत केलं आहे.
तामिळनाडूत गुंतवणुकीसाठी 3 मोठ्या कंपन्यांनी पुढाकार घेतला असून एक प्रकल्प मागील सरकारच्या काळातील आहे.
या एकूण 4 प्रकल्पासाठी 1 लाख 1 हजार 632 कोटींची गुंतवणुकीबरोबर यातून 93 हजाराहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
राज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक सुधारणा आणि औद्योगिक गुंतवणूक आणताना 2035 पर्यंत तामिळनाडूची अर्थव्यवस्था 1.5 ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प आहे.
थलपती विजय सरकारने अभियांत्रिकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी लार्सन अँड टुब्रो (L&T) सोबत 18600 कोटी रुपयांचा एक ऐतिहासिक सामंजस्य करार केला आहे.
एचडी ह्युंदाईच्या जागतिक व्यवसाय संचालकांनी 4 अब्ज डॉलर्स खर्चाने एक भव्य मेगा-जहाजबांधणी आणि सागरी अभियांत्रिकी क्लस्टर विकसित करण्याच्या आराखडा तयार.
अवजड उद्योगांना अखंड वीजपुरवठ्यासाठी 231 ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये 15032 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे.
कोचीन शिपयार्ड लिमिटेड आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड तामिळनाडूमध्ये दोन नवीन व्यावसायिक जहाजबांधणी कारखाने उभारण्यासाठी 30000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.