सरकारनामा ब्युरो
फॉर्च्युन 2024 ने काही दिवसांपूर्वी भारतातील पॉवरफुल 50 महिलांची यादी दिली होती. यात पहिल्या नंबरबर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण, दुसऱ्या नंबरवर बिझनेस वुमन नीता अंबानी, तिसऱ्या नंबरवर अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ, चौथ्या नंबरवर मिडिया वुमन बेला बजारिया आणि पाचव्या नंबरवर अर्थतज्ज्ञ माधवी पुरी बुच या आहेत.
देशाच्या विद्यमान अर्थमंत्री, निर्मला सीतारामन यांनी तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामास्वामी महाविद्यालयातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून (JNU) उच्च शिक्षण घेतले. त्यांनी जेएनयूमधून अर्थशास्त्रात एमए, एमफिल पदवी प्राप्त केली आहे.
नीता अंबानी यांनी मुंबईच्या नरसी मूंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. याशिवाय त्यांनी भरतनाट्यमचे सुद्धा रीतसर प्रशिक्षण घेतले आहे.
गीता गोपीनाथ या आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या उपव्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कला शाखेतून पदवी घेतली आहे. त्यानंतर दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी या दोन्हींमधून एमएची पदवी पूर्ण केली. 2001 मध्ये प्रिन्स्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी केली.
बेला बजारिया या एक ब्रिटिश-अमेरिकन व्यावसायिक महिला आहेत. याशिवाय मीडिया एक्झिक्युटिव्ह आहेत. सध्या त्या नेटफ्लिक्समध्ये चीफ कंटेट ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. बजारिया यांनी कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटीमधून महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर कॉलेज ऑफ लिबरल आर्ट्समधून बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी घेतली.
माधवी बुच या भारतातील पहिल्या सेबीच्या अध्यक्षा होत्या. त्यांचा शैक्षणिक प्रवास मुंबईतील फोर्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये सुरू झाला. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी येथेही शिक्षण घेतले. दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून गणितात पदवी प्राप्त केली असून आयआयएम अहमदाबादमधून एमबीए पूर्ण केले आहे.