Tamil Nadu Hung Assembly : तामिळनाडूत सत्ता सस्पेन्स; बहुमत नाही, तर राज्यपालांचा ‘हा’ अधिकार काय सांगतो?

Pradeep Pendhare

सत्ता पेच

234 सदस्य असलेल्या तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता आहे. पण कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही.

Tamil Nadu Hung Assembly | Sarkarnama

पक्षाचं संख्याबळ

टीव्हीके (TVK) 108, द्रमुक (DMK) 59, अण्णाद्रमुक (AIADMK) 47, काँग्रेस 5, भाजप 1, पीएमके 4, भाकप 2, माकप 2 जागा मिळाल्या आहेत.

Tamil Nadu Hung Assembly | Sarkarnama

राज्यपालाचे निर्देश

सर्वाधिक जागा जिंकलेला TVK पक्षाने, काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेचा दावा केला आहे. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बहुमत दाखवण्याचं आमंत्रण दिलं आहे.

Tamil Nadu Hung Assembly | Sarkarnama

घटनात्मक अधिकार

यात सरकार स्थापन होण्यास विलंब झाल्यास राज्यपाल किंवा राष्ट्रपतींकडे काही घटनात्मक अधिकार असतात.

Tamil Nadu Hung Assembly | Sarkarnama

राज्यघटनेतील तरतूद

विलंब झाल्यास राज्यघटनेतील कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्री, तर केंद्रात कलम 75 नुसार राष्ट्रपती पंतप्रधान नेमू शकतात.

Tamil Nadu Hung Assembly | Sarkarnama

फ्लोअर टेस्ट

कोणाकडे बहुमत आहे, याबाबत शंका असेल, तर सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांनुसार विधानसभा सभागृहात फ्लोअर टेस्ट घेणे आवश्यक मानले जाते.

Tamil Nadu Hung Assembly | Sarkarnama

...तर राष्ट्रपती राजवट

जर कोणताही पक्ष किंवा आघाडी बहुमत सिद्ध करू शकली नाही, तर राज्यात राज्यघटनेतील कलम 356 नुसार राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.

Tamil Nadu Hung Assembly | Sarkarnama

काळजीवाहू सरकार

नवीन सरकार स्थापन होईपर्यंत विद्यमान मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ‘काळजीवाहू सरकार’ म्हणून काम पाहू शकते.

Tamil Nadu Hung Assembly | Sarkarnama

राज्यपालांची भूमिका

त्रिशंकू विधानसभा आल्यास राज्यपाल, साधारणपणे स्पष्ट बहुमत असलेला पक्ष, निवडणूकपूर्व आघाडी, निवडणुकीनंतरची आघाडी किंवा सर्वात मोठा पक्ष प्राधान्यक्रम ठरवत पक्ष स्थापनेसाठी आमंत्रण देवू शकतात.

Tamil Nadu Hung Assembly | Sarkarnama

NEXT : केंद्राची आपत्कालीन क्रेडिट हमी योजना...

येथे क्लिक करा :