Ganesh Sonawane
जागतिक नाणेनिधी (IMF) च्या अलीकडील अहवालानुसार भारताने आता चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान निश्चित केले आहे.
या यशस्वी टप्प्यामुळे भारताने जपानलाही मागे टाकले आहे, अशी माहिती नीती आयोगाचे CEO बी. व्ही. आर. सुब्रमण्यम यांनी दिली.
नीती आयोगाच्या दहाव्या गव्हर्निंग काउंसिलच्या बैठकीनंतर सुब्रमण्यम यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था आता 4 ट्रिलियन डॉलरच्या घरात पोहोचली आहे.
सध्या भारताच्या पुढे फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे तीन देश आहेत.
भारत लवकरच जर्मनीलाही मागे टाकू शकतो आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनू शकतो, असा विश्वास सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक आर्थिक नकाशावर आपली ओळख अधिक भक्कम केली आहे. त्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनामुळे आणि विकासाच्या स्पष्ट दिशेमुळे भारताची वाटचाल आत्मविश्वासाने पुढे सुरू आहे.
भारताने केलेल्या या कामगिरीमुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. देशाची आर्थिक स्थिती भक्कम असून विविध क्षेत्रांतील विकास वेगाने होत आहे.
परदेशी गुंतवणूकदार भारताकडे अधिक विश्वासाने पाहू लागले आहेत. त्याचप्रमाणे भारतातील स्टार्टअप्स, नवउद्योजकता आणि नवसंधी यांचा फायदा देशाच्या एकूण जीडीपीला होत आहे.