Ganesh Sonawane
बजरंग प्रसाद यादव यांचा आयुष्याचा प्रवास खडतर आणि संघर्षमय राहिला. २०१४ मध्ये ते दहावीत असताना काही लोकांनी त्यांच्या वडिलांचा निर्घृण खून केला.
आपल्या वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी बजरंग यांनी आयपीएस होण्याचा निर्धार केला.
उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील ते रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही खूप बेताची होती. वडिलांच्या हत्येनंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली होती.
त्यांनी हार न मानता अभ्यास सुरु केला. पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये ते अपयशी ठरले, पण कठोर परिश्रम करत राहिले.
2022 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यूपीएससी परीक्षेत 454 वा रँक मिळवला.
कठिण परिस्थितीही त्यांनी जिद्द सोडली नाही. क्लासची फी भरण्यासाठी त्यांना घरातील धान्यही विकावं लागलं होतं.
बजरंग यांनी आयपीएस व्हावं असं त्यांच्या वडिलाचं स्वप्न होतं. त्यांनी ते पूर्ण केलं.
बजरंग प्रसाद यादव यांचं हे यश लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.