Simla Agreement : भारताच्या वॉटर स्ट्राईकला प्रत्युत्तर म्हणून पाकने रद्द केलेला सिमला करार काय आहे?

Jagdish Patil

पहलगाम

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेत 5 मोठे निर्णय घेतलेत.

Pahalgam Terror Attack | Sarkarnama

पाकिस्तान

भारताच्या सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या निर्णयानंतर संतापलेल्या पाकिस्तानने देखील थेट सिमला करार रद्द केला आहे.

Pakistan | Sarkarnama

सिमला करार

पकिस्तानने रद्द केलेला सिमला करार नेमका काय आहे याबाबतची माहिती जाणून घेऊया.

Simla Agreement | Sarkarnama

शरणागती

1971 साली झालेल्या भारत-पाक युद्धानंतर 2 जुलै 1972 ला दोन्ही देशांमध्ये 'सिमला करार' झाला. या करारानंतर 90 हजार पाकिस्तानी सैनिकांनी भारतासमोर शरणागती पत्करली होती.

Simla Agreement | Sarkarnama

इंदिरा गांधी

या करारावर भारताकडून इंदिरा गांधी आणि पाकिस्तानकडून झुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षरी केली.

Simla Agreement | Sarkarnama

शांतता

भारत-पाकिस्तानमध्ये शांतता आणि द्विपक्षीय संबंध चांगले ठेवण्यासाठी हा करार करण्यात आला.

Simla Agreement | Sarkarnama

चर्चा

तसंच सर्व वाद आणि समस्यांच्या शांततापूर्ण निराकरणासाठी चर्चा करून निर्णय घेऊ, कोणत्याही परिस्थितीत एकतर्फी निर्णय घेणार नाही, असंही यावेळी ठरलं.

Simla Agreement

हस्तक्षेप

एकमेकांविरोधात ताकदीचा वापर न करता एकमेकांच्या राजकीय स्वातंत्र्यात हस्तक्षेप करणार नाही, असाही ठराव दोन्ही देशांमध्ये झाला.

Simla Agreement

NEXT : भारतीय सैनिकांचे प्रशिक्षण कसे असते? अशी करून घेतात मानसिक आणि शारीरिक तयारी

Indian Army Training | Sarkarnama
क्लिक करा