Jagdish Patil
भारतीय सैन्यात भरती झालेल्या नवीन सैनिकांना सर्वात आधी प्राथमिक लष्करी प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं.
सैनिकांना हे प्रशिक्षण अलाहाबाद, अंबाला, बंगळुरू किंवा जबलपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या केंद्रात दिलं जातं.
यामध्ये दररोज धावणं, जोर-बैठका, रांगणे, दोरीवर चढणे अशा शारीरिक व्यायामासह मानसिक ताकदीसाठी विविध आव्हानांचा सामना करण्याचंही शिक्षण दिलं जातं.
लष्करी प्रशिक्षण हे क्लासरूम पुरतं मर्यादित नसतं, तर सैनिकांना जंगलं, टेकड्या, वाळवंट आणि बर्फाळ भागात पाठवलं जातं.
इथे त्यांना खऱ्या युद्धासारख्या परिस्थितीत टिकून कसं रहायचं याबाबतचं प्रशिक्षण दिलं जातं.
भारतीय सैन्य दलाकडून प्रत्येक सैनिकाला INSAS रायफल, AK-47, ग्रेनेड, मशीन गन अशी शस्त्रे वापरण्याचं प्रशिक्षण दिलं जातं.
कमांडो, NSG किंवा माउंटन वॉरियर्स अशा विशेष तुकड्यांसाठी वेगळे आणि कठीण प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये स्कूबा डायव्हिंग आणि गोरिल्ला युद्धाचा समावेश आहे.
इथे नियम आणि शिस्त पाळणे खूप महत्वाचे असून प्रत्येक सैनिकाला टीमवर्क आणि नेतृत्व कसं करायचं हे प्रशिक्षणाच्या काळात शिकवलं जातं.
या प्रशिक्षणामुळे सामान्य तरुणाचं रूपांतर खऱ्या सैनिकामध्ये होतं. इथे त्याला देशासाठी लढायला आणि सेवा, समर्पणासह कर्तव्याचे महत्त्व शिकवलं जातं.