Pradeep Pendhare
भारत-पाकिस्तान फाळणीत पाकिस्तानला किती सैन्य मिळालं होते?
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानस्थित दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याने दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे.
शस्त्रसंधी झाली असली, तर पाकिस्तानकडून त्याचं उल्लंघन झाल्याने, पुन्हा दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे.
1947 साली भारत-पाकिस्तान देशाची फाळणी वेळी ब्रिटीश इंडियन आर्मीने लष्काराचे दोन भागात विभागणी केली.
ब्रिटीश इंडियन आर्मीकडे त्यावेळी तब्बल चार लाख जवान होते.
आर्मी वाटणीत भारताला सर्वाधिक जवान मिळाले. त्यात पाकिस्तानला 1 लाख 40 हजार जवान देण्यात आले.
लष्करी जवान वाटणीत भारताला 2 लाख 60 हजार सैनिक मिळाले. यात हिंदू आणि शीख जवान सर्वाधिक होते.
पाकिस्तानला मिळालेल्या जवानांमध्ये सर्वाधिक मुस्लिम होते. मुस्लिन देश असल्याने तिथं जवानांची संख्या देखील तीच अधिक आहे.
मुस्लिम राष्ट्र असलेल्या पाकिस्तानकडे आता साडे सहा लाख पेक्षा जास्त सैनिक आहे.