Ganesh Sonawane
भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती कायम आहे. पाकिस्तानकडून शस्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले आहे. ऑपरेशन सिंदूर सुरुच राहणार असल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.
भारतीय सैन्याच्या नियमांनुसार, निवृत्तीनंतर विशेष परिस्थितीत कोणत्याही सैनिकाला पुन्हा सेवेत बोलावता येते.
1954 च्या लष्करी नियमांनुसार, गरज पडल्यास, निवृत्त सैनिकांना केंद्र सरकार पुन्हा सैन्यात सामील करू शकते.
पंरतु हे गंभीर परिस्थितीच होऊ शकते. उदा. युद्धजन्य परिस्थिती
सेवानिवृत्त सैनिक पुन्हा सेवेत रुजू होऊन देश सेवा करु शकतात.
जेव्हा देशात युद्धासारखी परिस्थिती उद्भवते तेव्हा बीएसएफ दल सर्वात आधी युद्धात उतरते.
भारत- पाकिस्तान युद्ध झाल्यास निवृत्त सेवकांना पुन्हा सेवेत घेतले जाऊ शकते.