Rajanand More
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. भारताकडून हल्ला होण्याची भीती पाकला आहे.
भारताने हल्ला करण्याच्या भीतीने पाकिस्तानातील नेते बरळू लागले असून आपल्याकडेही अणुबॉम्ब असल्याची धमकी देत आहेत.
पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम शरीफ यांनीही भारताला इशारा दिला आहे. भारताच्या आधीपासून आपल्याकडे अणुबॉम्ब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मरियम यांचे विधान महत्वाचे मानले जात आहे. कारण त्या पाकिस्तानातील सध्याच्या सर्वात शक्तीशाली राजकीय कुटुंबाच्या सदस्या आहेत.
मरियम यांचे वडील नवाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान असून त्यांचे बंधू सध्या पंतप्रधान आहेत.
मरियम यांच्या पक्षाची सध्या पाकिस्तानात सत्ता आहे. त्यांच्या कुटुंबाचा देशात दबदबा असल्याने विधानाला राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.
मरियम या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत. मागील वर्षी निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत त्या या खुर्चीवर विराजमान झाल्या आहेत.
मरियम यांचे पती सफदर अवान हे पाकिस्तानी लष्करात कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. 1992 मध्ये त्यांचा विवाह झाला आहे.
2012 मध्ये त्या सक्रिय राजकारणात आल्या. त्यांच्याकडे लगेच 2013 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पंतप्रधानांच्या युवा कार्यक्रमाच्या त्या अध्यक्षा होत्या.
2024 मध्ये पहिल्यांदाच त्यांनी निवडणुकीत नशीब आजमावले आणि विजयीही झाल्या. नवाज शरीफ यांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.