Ganesh Sonawane
भारत पाकिस्तानला विविध खाद्य वस्तू निर्यात करतो. पाकिस्तानच्या रोजच्या जेवणात त्याचा समावेश होतो. यात विविध प्रकारचे मसाले, तांदूळ आणि फळांचा समावेश आहे.
मिरची, हळद आणि जिरे या वस्तू पाकिस्तानला पाठवल्या जातात.
पाकिस्तान भारताकडून बासमती तांदूळ मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. पाकिस्तानात बिर्याणी तयार करण्यासाठी या तांदळाचा वापर केला जातो.
भारतातील आसाम आणि दार्जिलिंग येथील चहा पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात निर्यात केला जातो.
भारतातून पाकिस्तानमध्ये कांद्यांची निर्यात मोठ्या प्रमाणात होते.
लसूण, बटाटे या शेतमालाची निर्यात पाकिस्तानला होते.
जास्त मागणीच्या काळात भाजीपाला देखील भारतातून पाकिस्तानला निर्यात केला जातो.
विविध प्रकारच्या डाळी, छोले, हरभरा या खाद्य वस्तू देखील पाकिस्तानला निर्यात होतात.
याव्यतिरिक्त भारत पाकिस्तानला निर्यात करत असलेल्या वस्तूंमध्ये सेंद्रिय रसायने, औषधी उत्पादने, खनिजे, साखर आणि मिठाई यांचाही समावेश आहे.