Mangesh Mahale
मुंबईसह स्वतंत्र मराठी राज्याच्या निर्मितीसाठी उभारलेले हे ऐतिहासिक आंदोलन होते. पोलिसांच्या गोळीबारात १०६ आंदोलक हुतात्मा झाले. या लढ्यामुळे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.
स्वतंत्र गुजरात राज्याच्या निर्मितीसाठी उभारलेल्या या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर निदर्शने झाली. पोलिस कारवाईत अनेक आंदोलकांचा मृत्यू झाला आणि शेकडो जण जखमी झाले. अखेर १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची निर्मिती झाली.
केरळमधील कम्युनिस्ट सरकारविरोधात काँग्रेस आणि इतर संघटनांनी आंदोलन छेडले. त्यानंतर केंद्र सरकारने कलम ३५६ लागू करून ई. एम. एस. नंबूदरीपाद यांचे सरकार बरखास्त केले.
जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचार आणि सत्तेच्या गैरवापराविरोधात देशव्यापी आंदोलन उभे राहिले. त्यानंतर २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू करण्यात आली.
७ नोव्हेंबर १९६६ रोजी स्वामी करपात्री महाराज यांच्या नेतृत्वाखाली संसदेसमोर गोहत्या बंदीच्या मागणीसाठी आंदोलन झाले. पोलिसांच्या गोळीबारात अनेक साधू-संतांचा मृत्यू झाला.
२३ नोव्हेंबर १९९४ रोजी अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी गोवारी समाजाने विधानभवनावर मोर्चा काढला. चेंगराचेंगरीत ११४ आंदोलकांचा मृत्यू झाला.
भ्रष्टाचारविरोधी जनलोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत उपोषणाची घोषणा केली. उपोषणापूर्वीच त्यांना अटक करून कारागृहात नेण्यात आले, त्यानंतर देशभर आंदोलनाची लाट उसळली.
९ ऑगस्ट २०११ रोजी पुण्यातील मावळ येथे पवना जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनात पोलिसांनी गोळीबार केला. यात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.