Mangesh Mahale
सरपंच संतोष देशमुख हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा त्याच्यावर आरोप आहे. खंडणीच्या गुन्ह्यात तो आरोपी आहे.
वाल्मिक हा मूळचा परळीतील पांगरी गोपीनाथ गड गावचा.महाविद्यालयीन शिक्षणासाठी तो परळीला आला.
परळीतून VCR भाड्याने आणून गावच्या जत्रेत सिनेमे दाखवायचा. त्यासाठी तो तिकीटाचे पैसे घ्यायचा.
गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू फुलचंद कराड यांच्या संपर्कात आला. कराड यांनी त्याला मुंडे यांच्या घरी कामाला ठेवलं.
मुंडे कुटुंबातील फुटीनंतर वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांच्यासोबत जाणे पसंत केले. तो त्यांच्या गळ्यातील ताईत बनला.
विश्वासू आणि चाणाक्ष असल्याने अनेक कामांची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याच्याकडे दिली.
धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री झाल्याने सर्व कार्यकारी अधिकार वाल्मिककडेच होते.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड याच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे.