Mangesh Mahale
विशाल अगरवाल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडीत सुनावण्यात आली आहे.
पुण्यातील नामांकित रिअल इस्टेट कंपनी ब्रम्हा मल्टीकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे ते संचालक आहेत.
रामकुमार अगरवाल, विनोदकुमार अगरवाल, दिनेश अगरवाल, हिमांशू अगरवाल, करण अगरवाल, विशाल अग्रवाल हे कंपनीचे संचालक आहेत.
अपघात करणारा पोर्शे कारचा अल्पवयीन चालकांचे ते वडील आहेत. अपघातात दुचाकीवरील अनिस दुधिया, अश्विनी कोस्टा याचा मृत्यू झाला.
अपघातानंतर विशाल अगरवाल हे फरार झाले होते, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
अल्पवयीन मुलाला चालवण्यासाठी कार का दिली, असा सवाल न्यायालयाने चौकशीत त्यांना केला आहे.
विशाल अगरवाल यांना अलिशान गाड्यांची विशेष आवड असून यांच्या मालकीच्या विविध कंपन्यांची मालमत्ता ही सुमारे 6 कोटी आहे.
अगरवाल कुटुंबियांचे गुन्हेगारी जगाशी कनेक्शन असल्याचे यापूर्वी तपासात स्पष्ट झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.