Ethanol Blending India : युद्धानं पेट्रोल संकट गडद; 1.5 लाख कोटी परकीय चलनाची बचत! मोदींकडून भारताच्या 'इथेनॉल ब्लेंडिंग'चं कौतुक!

Pradeep Pendhare

युद्धाचं संकट गडद

जागतिक स्तरावर इराण-अमेरिका युद्धामुळे इंधन संकट गडद होत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 'इथेनॉल ब्लेंडिंग' कार्यक्रमाचं महत्त्व अधोरेखित सांगितलं.

Ethanol Blending India | Sarkarnama

'इथेनॉल ब्लेंडिंग'

भारताच्या 'इथेनॉल ब्लेंडिंग' धोरणामुळे केवळ परकीय चलनात मोठी बचत केली नाही, तर कच्च्या तेलावरील अवलंबित्वही कमी झालं आहे.

Ethanol Blending India | Sarkarnama

परकीय चलनाची बचत

इथेनॉल निर्मितीमुळे भारताचे सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे.

Ethanol Blending India | Sarkarnama

पेट्रोल-इथेनाॅल मिसळ

भारत सध्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल (E20) मिसळण्याचे उद्दिष्ट गाठण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहे.

Ethanol Blending India | Sarkarnama

आयातीवर खर्च वाचला

पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे भारताने 4 कोटी बॅरलपेक्षा जास्त कच्च्या तेलाची आयात वाचवली आहे.

Ethanol Blending India | Sarkarnama

इथेनाॅलमुळे बचत

दहा वर्षांत इथेनॉल पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये मिळाले असून, इथेनॉलमुळे हा पैसा देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाल्याचं पीएम नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

Ethanol Blending India | Sarkarnama

बचतीचा पैसा शेतकऱ्यांना

इथेनॉल प्रामुख्याने ऊस आणि धान्यापासून बनवले जाते. यामुळे तेल कंपन्यांकडून मिळणारा पैसा थेट देशातील शेतकऱ्यांच्या खिशात गेला आहे.

Ethanol Blending India | Sarkarnama

ऊर्जा सुरक्षा मजबूत

भारताची ऊर्जा सुरक्षा मजबूत झाली आहे. कार्बन उत्सर्जनात घट झाली असून भारताच्या पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत मिळत आहे.

Ethanol Blending India | Sarkarnama

स्वदेशी इंधनाला आधार

मध्यपूर्वेतील तणावामुळे तेलाचा पुरवठा विस्कळीत होण्याचा धोका आहे. अशा वेळी भारताचे हे स्वदेशी इंधन धोरण देशाला मोठा आधार देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमूद केलं.

Ethanol Blending India | Sarkarnama

NEXT : जगाला धडकी भरवणारी क्षेपणास्त्रे....

येथे क्लिक करा :