Rashmi Mane
आजच्या काळात संरक्षण तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत आहे. क्षेपणास्त्र हे कोणत्याही देशाच्या सुरक्षेचं महत्त्वाचं शस्त्र मानलं जातं. लांब पल्ला, अचूक लक्ष्य आणि अण्वस्त्र क्षमता यामुळे त्यांची ताकद वाढते.
जगात सर्वाधिक प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाबाबत अमेरिका आघाडीवर मानला जातो. मोठं संरक्षण बजेट आणि अत्याधुनिक संशोधनामुळे अमेरिका नेहमीच पुढे असतो.
अमेरिकेकडे आधुनिक मिसाइल डिफेन्स सिस्टम आणि अत्यंत प्रगत क्षेपणास्त्रे आहेत. त्यामुळे त्यांची लष्करी ताकद जगात सर्वाधिक प्रभावी मानली जाते.
रशिया लांब पल्ल्याच्या आणि अण्वस्त्रक्षम क्षेपणास्त्रांसाठी ओळखला जातो. त्यांची इंटरकॉन्टिनेंटल मिसाइल्स जगभरात प्रसिद्ध आहेत.
चीनही या क्षेत्रात वेगाने पुढे येत आहे. त्यांनी आधुनिक आणि अचूक क्षेपणास्त्र प्रणाली विकसित केल्या आहेत, ज्यामुळे त्यांची ताकद वाढली आहे.
भारत देखील क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात जलद प्रगती करत आहे. स्वदेशी संशोधनामुळे भारताची लष्करी ताकद मजबूत होत आहे.
अग्नी-5, पृथ्वी आणि ब्रह्मोस यांसारखी क्षेपणास्त्रे भारताने विकसित केली आहेत. ब्रह्मोस विशेषतः वेग आणि अचूकतेसाठी ओळखली जाते.
क्षेपणास्त्रांची अचूक संख्या गुप्त ठेवली जाते. तरीही अमेरिका, रशिया आणि चीन आघाडीवर असून भारत साधारण चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर मानला जातो.