Mangesh Mahale
आज पहाटे 2:55 वाजता GSLV-F17 द्वारे EOS-05 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
PSLVच्या सलग दोन अपयशांनंतर सुमारे आठ महिन्यांनी हे मिशन यशस्वी झाले.
EOS-05 सुमारे 36,000 किमी उंचीवरून पृथ्वी आणि भारताचे निरीक्षण करणार आहे.
उपग्रहाच्या मदतीने सीमावर्ती भाग, समुद्री क्षेत्र, हवामान आणि आपत्तीग्रस्त भागांचे निरीक्षण करता येणार आहे.
जिओसिंक्रोनस ऑर्बिटमधून काम करणारा भारताचा पहिला इमेजिंग उपग्रह म्हणून याचे महत्त्व आहे.
GSLV-F17 हे भारताच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल कार्यक्रमातील 19वे उड्डाण आहे.
GSLV-F17 ची उंची 51.7 मीटर , तर प्रक्षेपणावेळी वजन सुमारे 420.5 टन आहे.
पहिल्या टप्प्यात सॉलिड मोटर आणि चार लिक्विड स्ट्रॅप-ऑन बूस्टर आहेत.
शेवटच्या टप्प्यात स्वदेशी क्रायोजेनिक अपर स्टेज वापरण्यात आले आहे.
सीमा सुरक्षा, हवामान निरीक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनासह रणनीतिक व नागरी क्षेत्रातील क्षमता आणखी मजबूत होणार.