Mangesh Mahale
राम मंदिराचे नवे CEO म्हणून जितेंद्र मिश्रा यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय वायुसेनेचे माजी वरिष्ठ अधिकारी, असून एअर मार्शल पदावरून निवृत्त झाले आहेत. जवळपास चार दशकांचा सैन्यसेवेचा अनुभव त्यांना आहे.
फाइटर पायलट, टेस्ट पायलट आणि वरिष्ठ कमांडर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.6 डिसेंबर 1986 रोजी भारतीय वायुसेनेत फाइटर पायलट म्हणून त्यांची नियुक्ती झाली
त्यांचे शिक्षण पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA)येथे झाले आहे. एअर फोर्स टेस्ट पायलट्स स्कूल, बंगळुरू येथेही प्रशिक्षण झाले आहे.
अमेरिकेतील Air Command and Staff College, ब्रिटनमधील Royal College of Defence Studies येथूनही उच्च दर्जाचे लष्करी शिक्षण घेतले आहे.
त्यांना 3,000+ तासांचा उड्डाण अनुभव आहे. फाइटर कॉम्बॅट लीडर, एक्सपेरिमेंटल टेस्ट पायलट म्हणूनही जबाबदारी, फाइटर स्क्वाड्रनची कमान सांभाळली.
1 जानेवारी 2025 रोजी त्यांनी भारतीय वायुसेनेच्या Western Air Command चे Air Officer Commanding-in-Chief म्हणून पदभार स्वीकारला
ऑपरेशन सिंदूरमधील योगदानासाठी त्यांना ‘सर्वोत्तम युद्ध सेवा मेडल’ मिळाले आहे. यापूर्वी त्यांना अति विशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल सन्मान मिळाले आहेत.