Rashmi Mane
भारताच्या सायबर संरक्षण क्षमतेत ऐतिहासिक भर. डीआरडीओ अंतर्गत तयार झाली पहिली सायबर कमांडो तुकडी.
डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डीआयएटी), पुणे येथे सहा महिन्यांच्या विशेष प्रशिक्षणानंतर 30 सायबर कमांडो देशसेवेस सज्ज झाले.
सायबर हल्ल्यांना तोंड देणे, महत्त्वाची सरकारी माहिती संरक्षित करणे आणि डिजिटल युद्धात हा प्रशिक्षणाचा मुख्य हेतू.
गृह मंत्रालयाने निवडलेल्या कायदा अंमलबजावणी संस्थांमधील 30 अधिकाऱ्यांनी हा सायबर कमांडो अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
डीआयएटीच्या पुढील दोन तुकड्या लवकरच सुरू होतील. देशभरातील इतर 9 संस्थांमध्येही अशीच सायबर प्रशिक्षण केंद्रे उभारली जात आहेत.
डीआयएटीमध्ये सायबर सुरक्षा बरोबरच सेमीकंडक्टर आणि डिफेन्स स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये एम.टेक अभ्यासक्रमही सुरू केले आहेत.
ही पहिली तुकडी भारताच्या डिजिटल सीमा अधिक मजबूत करेल, सायबर धोके रोखण्यासाठी देशासाठी नवी ढाल निर्माण झाली आहे.