राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सुप्रिया सुळेंकडून दिग्गज नेत्यांना खास पैठणी स्टोल भेट; पाहा खास फोटो!

Rashmi Mane

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे कुशल विणकरांनी तयार केलेली पारंपरिक पैठणी स्टोल भेट दिला.

Supriya Sule | Sarkarnama

सोशल मीडियावर पोस्ट

सुळे यांनी सोशल मीडियावर पंतप्रधानांचे आभार मानत लिहिले, "राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त  भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

Supriya Sule | Sarkarnama

मल्लिकार्जुन खरगे यांना भेट

आज नवी दिल्ली येथे राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त माननीय मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. त्यांना पारंपारिक पैठणी स्टोल देऊन सन्मानित केले.

Supriya Sule | Sarkarnama

सोनिया गांधी यांनाही स्टोल भेट

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोनिया गांधी यांना महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचे प्रतीक असलेली पैठणी स्टोल भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

Supriya Sule | Sarkarnama

केळी फायबर तंत्रज्ञानावर चर्चा

भेटीत केळी फायबरपासून कापडनिर्मितीतील अडचणी आणि ग्रामीण विणकरांच्या समस्यांवरही चर्चा झाली.

Supriya Sule | Sarkarnama

Next : कबुतरांनी मुंबईचं राजकारण तापवलं; पण विरोध का? कोणते आजार होतात?

येथे क्लिक करा