Aslam Shanedivan
पाकिस्तानशी तणावाची स्थिती असताना भारताने युद्ध सामग्रीकडे विशेष लक्ष देताना स्वदेशी बनावटीच्या ‘भार्गवास्त्र’ अँटी-ड्रोन सिस्टीमची चाचणी केली.
यामुळे भारताच्या संरक्षण प्रणालीत आणखी स्वदेशी बनावटीच्या सिस्टीम भर पडली असून याचा वापर ड्रोन पाडण्यासाठी होणार आहे
'भार्गवास्त्र' अँटी-ड्रोन सिस्टीमची चाचणी ओडिशातील गोपाळपूरमधील सीवर्ड फायरिंग रेंजवर घेण्यात आलीय.
ही चाचणी ड्रोनच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे.
'भार्गवास्त्र' अँटी-ड्रोन सिस्टीम 6 ते 10 किलोमीटर अंतरावरून लहन आणि प्रचंड वेग असलेल्या ड्रोनचा शोध घेऊ शकते
भार्गवस्त्र ही एक स्वदेशी आणि स्वस्त ड्रोनविरोधी प्रणाली असून याचा वापर लष्कर, हवाई दल आणि नौदलात करता येतो.
ही सिस्टीम ड्रोनचा फक्त शोधच घेत नाही तर ते नष्टही करते. यामुळे भारताला आता ड्रोन हल्ले टाळण्यासाठी मोठा फायदा होणार आहे
दरम्यान नुकताच भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता. ज्यात अनेक ड्रोन पाडण्यात आले होते