Rashmi Mane
भारतातील लोकांच्या खिशातून आता कॅश जवळजवळ गायब होत चालली आहे. तिची जागा घेतली आहे मोबाईल फोनने, ज्याद्वारे लोक डिजिटल पद्धतीने पैसे ट्रान्सफर करत आहेत.
भारतातील लोकप्रिय पेमेंट सिस्टम UPI आता देशाबाहेरही पाऊल टाकत आहे. अलीकडेच ही सेवा दोहामध्ये सुरू करण्यात आली आहे.
अनेकांच्या मनात प्रश्न आहे की, तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतापेक्षा पुढे असलेल्या देशांकडे UPIसारखी सेवा का नाही?
पण प्रत्यक्षात अमेरिका आणि युरोपमध्ये अनेक पेमेंट सर्विसेस उपलब्ध आहेत, जसे की ACH, Zelle, Venmo, Cash App इत्यादी पण त्या UPIसारख्या एकत्रित (युनिफाइड) प्रणाली नाहीत.
अमेरिका आणि युरोपमधील बहुतांश लोक Apple Pay, Google Pay किंवा Samsung Pay सारख्या वॉलेट्सचा वापर करतात.
मात्र, या सुविधा “वॉलेट टू वॉलेट” स्वरूपात काम करतात, “बँक टू बँक” ट्रान्सफर नाही. UPIच्या विपरीत, या प्रणाली एकमेकांशी थेट जोडलेल्या नाहीत.
NPCIने तयार केलेला UPI मॉडेल आज जगासाठी "ब्लूप्रिंट" बनला आहे. सिंगापूर, नेपाळ, भूतान, फ्रान्ससह अनेक देश भारताचा हा वेगवान आणि स्वस्त मॉडेल स्वीकारत आहेत.