Mumbai One App : एकाच क्लिकवर लोकल, बस, मेट्रो अन् मोनोरेलचं तिकीट : मुंबईकरांनो, 'वन ॲप'ची प्रोसेस समजून घ्या!

Rashmi Mane

ऐतिहासिक दिवस

मुंबई आणि परिसरातील लाखो प्रवाशांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बहुप्रतिक्षित 'मुंबई वन ॲप'चे (Mumbai One App) आज उद्घाटन झाले आहे.

Sarkarnama

एकाच ॲपमुळे..

या एकाच ॲपमुळे आता मुंबईकरांना बस, मेट्रो, लोकल ट्रेन आणि मोनोरेलच्या तिकिटांसाठी वेगवेगळ्या ॲप्स किंवा रांगांमध्ये उभे राहण्याची गरज भासणार नाही.

Sarkarnama

सुखकर प्रवास

या सुविधेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून त्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि विना-अडथळा होण्यास मदत होईल.

Sarkarnama

मोबाईल तिकीटिंग ॲप

'मुंबई वन ॲप' हे मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) तब्बल 11 विविध वाहतूक सेवांना एकत्र जोडणारे देशातील पहिलेच इंटिग्रेटेड मोबाईल तिकीटिंग ॲप ठरले आहे.

Sarkarnama

एकत्रित तिकीट

प्रवासी ‘सीटी बस’, ‘बेस्ट’, ‘एमएमआरडीए मेट्रो’, ‘रिलायन्स मेट्रो’, ‘एमएमआरसीएल मेट्रो’, ‘सिडको मेट्रो’, तसेच ‘मोनोरेल’च्या सेवांसाठी या अॅपवरून एकत्रित तिकीट काढू शकतील.

Sarkarnama

या सुविधांचा समावेश

या ॲपमध्ये प्रवासाचे नियोजन करण्यापासून ते रिअल-टाईम अपडेट्स आणि SOS सारख्या आपत्कालीन सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे.

Sarkarnama

प्रवाशांसाठी अॅप उपयुक्त

अॅपमध्ये जवळच्या स्थानकांची, पर्यटनस्थळांची आणि महत्त्वाच्या ठिकाणांची नकाशासह माहितीही मिळेल. आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा सूचना आणि तत्काळ मदतीसाठीही हे अॅप उपयुक्त ठरणार आहे.

Sarkarnama

प्रवाशांसाठी सोपी प्रणाली

‘मुंबई वन’ अॅपमुळे प्रवास अधिक सोपा, वेळ वाचवणारा आणि पर्यावरणपूरक होईल. या उपक्रमामुळे डिजिटल व्यवहारांना चालना मिळून, सार्वजनिक वाहतूक प्रणाली अधिक समन्वित आणि प्रवाशांसाठी सोपी होणार आहे.

Sarkarnama

Next : पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 'या' राज्यांमध्ये जमा; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार पैसे?

येथे क्लिक करा