Rashmi Mane
भारत आणि अमेरिका यांच्यात अखेर ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब झालं आहे. अनेक महिन्यांच्या चर्चेनंतर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली असून, या कराराला ‘विन-विन डील’ असं संबोधलं जात आहे.
या करारानुसार अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात शुल्क थेट 50 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी केलं आहे. यामुळे ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांना अमेरिकन बाजारात मोठा फायदा होणार आहे.सामान्य ग्राहकांना फायदा कसा?
भारतही अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ आणि नॉन-टॅरिफ अडथळे कमी करण्यास तयार झाला आहे. काही उत्पादनांवर हे शुल्क शून्यापर्यंत नेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा भारताच्या व्यापार धोरणातील मोठा बदल मानला जातो.
बाजार खुला केल्याने अमेरिकेतून आयात होणाऱ्या अनेक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता आहे. आयात खर्च कमी झाल्याने त्याचा थेट फायदा भारतीय ग्राहकांना मिळणार आहे.
डाळी, दुग्धजन्य पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांवर आयात शुल्क कमी होऊ शकतं. वाढत्या महागाईच्या काळात यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि टेक हार्डवेअर आता अधिक परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध होऊ शकतात.
कापड उद्योग, रत्न व दागिने, स्टील, रसायने आणि इंजिनिअरिंग वस्तूंना अमेरिकेत मोठी संधी मिळणार आहे.
स्टील, अॅल्युमिनियम, कॉपर आणि काही ऑटो पार्ट्सवर मात्र अजूनही जास्त शुल्क कायम राहणार आहे. अमेरिकेच्या ‘सेक्शन 232’ अंतर्गत या वस्तूंवर सुमारे 50% ड्युटी लागूच राहील.