Rashmi Mane
जगभरातील युद्ध आणि संघर्षांमध्ये मानवी हक्कांचे रक्षण करण्यासाठी बनवलेले आंतरराष्ट्रीय नियम म्हणजे जिनेव्हा करार (Geneva Conventions).
जखमी झालेले सैनिक व युद्धकैद्यांचे मुलभूत अधिकार जपणारा जिनेव्हा करार आहे. युद्धात सहभागी नसलेले नागरिक, जखमी आणि शस्त्रसमर्पण केलेले सैनिक यांना कोणताही शारीरिक, मानसिक त्रास देता येणार नाही, असे हा करार सांगतो.
हे करार युद्धात बंदीवान, जखमी सैनिक, आरोग्य सेवा आणि नागरी लोकांचे संरक्षण करतात.
जिनेव्हा करार 12 ऑगस्ट 1949 रोजी स्वीकारण्यात आले होते.
जखमी व आजारी सैनिकांचे संरक्षण (स्थलसेनेत)
समुद्रात जखमी सैनिक व नौदलांचे रक्षण
युद्ध बंदीवानांचे अधिकार व वागणूक
नागरी लोकांचे युद्ध काळात संरक्षण
✅ मानवी हक्कांचे रक्षण
✅ युद्धातील क्रूरतेवर मर्यादा
✅ आंतरराष्ट्रीय शांततेस चालना
जगातील बहुतांश देश हे करार मान्य करतात व आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस (ICRC) संस्था यावर लक्ष ठेवते.
युद्धकैद्यांना त्यांच्या कुटुंबाशी संपर्क करून आपली ख्याली खुशाली कळवण्याचा संपूर्ण अधिकार आहे. युद्धकैद्यांवर योग्य न्यायिक सहाय्य उपलब्ध करून देणं बंधनकारक आहे.
हा करार पाळावा यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहे. म्हणजेच, शत्रू देशात सैनिक जर सापडला तर तो आपल्या पूर्ण गणवेशात असावा. तसेच, शत्रूराष्ट्रांनी विचारणा केल्यानंतर सैनिकाने आपलं नाव, हुद्दा आणि इतर माहिती द्यावी.
मात्र वैयक्तिक माहिती वगळता इतर गुप्त माहिती देणं बंधनकारक नाही. हे नियम त्या सैनिकाने पाळल्यास जिनेव्हा करारानुसार सबंधित सैनिकाच्या मुलभूत अधिकारांचे रक्षण करणे विरुद्ध देशाला अनिवार्य आहे.