Rajanand More
राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील नगरपंचायत व नगरपरिषदांची निवडणूक जाहीर केली आहे. त्यानुसार 2 नोव्हेंबरला मतदान तर 3 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी संबंधित व्यक्तीचे अंतिम मतदारयादीत मतदार म्हणून नोंद असणे आवश्यक. इतर कोणत्याही कायद्याद्वारे अपात्र न ठरवलेली व्यक्ती सदस्य होण्यास पात्र.
निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या निश्चित दिनांकाला संबंधित व्यक्तीचे वय 21 वर्षे पूर्ण असायला हवे.
सदस्य म्हणून निवडणूक लढविण्यासाठी त्या संबंधित नगरपरिषद किंवा नगरपंचायतीच्या मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या खर्चाच्या संदर्भात अपात्र ठरविलेली व्यक्ती आयोगाच्या आदेशापासून आदेशामध्ये नमूद केलेल्या कालावधीपर्यंत निवडणूक लढविण्यास पात्र ठरत नाही.
निवडणूक लढविण्यासाठी किंवा सदस्य म्हणून राहण्यास वेगवेगळ्या प्रकरणात तीन, पाच किंवा सहा वर्षांपर्यंत अपात्रतेचा कालावधी असू शकतो.
भारतीय निवडणूक आयोगाने निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविलेली व्यक्ती नगरपरिषद किंवा नगरपंचायतीची निवडणूक लढवू शकत नाही.
अपात्र ठरविलेल्या व्यक्तींची यादी संबंधित जिल्हाधिकारी आणि नगरपरिषद किंवा नगरपंचायतीच्या कार्यालयात पाहता येईल.
निवडणुकीतील खर्चाच्या मुद्दयावरून अपात्र ठरिवण्यात आल्यानंतर अपात्रता दूर किंवा कालावधी कमी करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगास आहे.