सरकारनामा ब्यूरो
आम आदमी पक्षाचे सदस्य राघव चढ्ढा हे पंजाबमधील राज्यसभेचे सर्वात तरुण खासदार आहेत.
भाजप नेते तेजस्वी सूर्या हे भाजपचे युवा नेते आहेत तसेच दक्षिण बंगळूरू लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.
भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे हे मध्य प्रदेशातून प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे खासदार आहेत.
सचिन पायलट हे राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आहेत.
दुष्यंत चौटाला हे जननायक पक्षाचे संस्थापक आणि हरियाणाचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत.
काँग्रेस पक्षाचे नेते जिग्नेश मेवाणी हे माजी पत्रकार आणि वकील आहेत.
राजकारणी तेजस्वी यादव हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत.
काँग्रेस नेते कन्हैय्या कुमार यांनी जेएनयूच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष तसेच ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे नेते म्हणून काम केले आहे.
राजकारणी तसेच सामाजिक कार्यकर्ते हार्दिक पटेल यांनी पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व केले तेव्हापासून ते राजकारणात सक्रीय झाले.
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आहेत तसेच ते मुंबई विधानसभेचे आमदार आहेत.