सरकारनामा ब्यूरो
IAS रवी कुमार हे मूळचे राजस्थान येथील श्री गंगानगर जिल्ह्यातील आहेत.
विजयनगर येथे प्राथमिक शिक्षण आणि अनुपगढ येथील शारदा कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.
पदवीचे शिक्षण घेईपर्यंत रवी कुमार त्यांच्या वडिलांना शेतीकामात मदत करत होते.
रवी कुमार यांना यूपीएससीच्या पहिल्या प्रयत्नात भारतीय संरक्षण लेखा सेवा (IDAS), दुसऱ्या प्रयत्नात भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) केडर मिळाले होते.
तिसऱ्या प्रयत्नात पूर्णपणे अपयशी झाल्यानंतर 2021 मध्ये चौथ्या प्रयत्नात यश मिळवले.
AIR18 रँक
सुरुवातीचे 17 उमेदवार इंग्रजी माध्यम तर रवी कुमार हिंदीतून AIR18 रँक मिळवत यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले
2021च्या बॅचमध्ये ते हिंदी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्ये टॉपर होते.
रवी कुमार यांच्या या प्रवासात त्यांनी हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले आणि IAS चे स्वप्न पूर्ण केले.
वर्कआऊट आणि शेती करणे हा त्यांचा आवडता छंद आहे.