सरकारनामा ब्यूरो
भारतीय वायुसेनेद्वारे मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर हवाई पराक्रम दाखवण्यात आले.
वायुसेनेचा हा नेत्रदीपक एअर शो आउटरीच कार्यक्रमाचा एक भाग होता.
चित्तथरारक प्रदर्शनांनी स्थानिकांचे लक्ष वेधून घेत सगळ्यांना मोहित केले.
भारतीय वायुसेना आणि स्थानिक समुदाय यांच्यातील सखोल संबंध वाढवण्यासाठी या आऊटरीच कार्यक्रमाचे नियोजन केले गेले.
भारतीय वायुसेनेची क्षमता आणि त्याच्या व्यावसायिकतेबद्दल जागरुकता निर्माण करणे हा या शोचा मुख्य उद्देश आहे.
केवळ एरोबॅटिक्सच नाही तर यामध्ये वैविध्यपूर्ण हवाई क्रियाकलापांचाही समावेश आहे.
दलाच्या 'सारंग' एरोबॅटिक टीमच्या पुढाकाराने अचूक कौशल्य प्रदर्शनाने प्रेक्षकांना आकर्षित केले.
वायुदलातर्फे सादर केला जाणारा हा एअर शो पाहण्यासाठी मुंबईकर देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत.