Rashmi Mane
भारतातील डिफेन्स सेक्टरमध्ये मोठा बदल होणार आहे. चेतक आणि चीता हेलिकॉप्टरच्या जागी येणार अत्याधुनिक हेलिकॉप्टर.
रक्षा मंत्रालयाने जुनी चेतक आणि चीता हेलिकॉप्टर बदलण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी तब्बल 200 नवीन हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या खरेदीतून भारतीय सैन्याला 120 आणि वायुसेनेला 80 हेलिकॉप्टर मिळणार आहेत. यामुळे दोन्ही दलांच्या वेग आणि ताकदीत मोठी वाढ होणार आहे.
नवीन हेलिकॉप्टर विशेष निगराणी करणार त्यासोबतच मिशनसाठी सैनिकांनाही नेता येणार त्यासोबतच ग्राउंड ऑपरेशनला मदत मिळेल, तसेच जखमींची सुटका व शोध-बचाव मोहिमाही सहज पार पडू शकतील.
हे हेलिकॉप्टर दिवस आणि रात्र दोन्ही वेळा काम करण्यास सक्षम असतील. त्यामुळे कोणत्याही हवामानात आणि परिस्थितीत ऑपरेशन करता येईल.
कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून 45,000 कोटी रुपयांच्या 156 लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर खरेदीस मंजुरी दिली आहे.
हे नवीन कॉम्बॅट हेलिकॉप्टर चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तैनात केले जातील, ज्यामुळे देशाची सीमासुरक्षा अधिक मजबूत होईल.
आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज हे हेलिकॉप्टर भारतीय सैन्य व वायुसेनेची ताकद दुप्पट करतील. यामुळे भारताची सुरक्षा आणि आत्मनिर्भरता दोन्ही मजबूत होणार आहेत.