Pradeep Pendhare
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी काश पटेल यांची नियुक्ती झाली.
काश पटेल यांना रिपब्लिकन नेतृत्वाखालील सिनेटमध्ये 49च्या आसपास मते मिळाली आहे.
अमेरिकेतल्या प्रमुख 'FBI' यंत्रणा कायदा अंमलबजावणी यंत्रणेचे नेतृत्व करणारे पहिले भारतीय-अमेरिकन बनले.
44 वर्षीय काश पटेल 30 हजारहून अधिक कर्मचारी असलेल्या 'FBI' संघटनचे नेतृत्व करणार आहेत.
'FBI' राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद आणि हिंसक गुन्ह्यांचा शोध घेणारी यंत्रणा आहे.
काश यांच्या नियुक्तीनंतर व्हाइट हाऊसचे 'डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ' डॅन स्कॅव्हिनो यांनी अभिनंदन केले.
डॅन स्कॅव्हिनो यांनी समाज माध्यमांवर 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील मल्हारी गाण्याची संपादित चित्रफीत पोस्ट केली.
काश पटेल यांचा चेहरा रणवीस सिंग यांच्या चेहऱ्यावर चढवला असून, 'मल्हारी' गाण्यावर ते विजयी नृत्य करताना दाखवला आहे.