Chetan Zadpe
दोन व्यक्तींच्या आसनाची व्यवस्था असणारे बोईंगचे अपाचे हे चार ब्लेड आणि दुहेरी इंजिन असलेले अत्याधुनिक हेलिकॉप्टर आहे.
कठीण किंवा आपतकालीव स्थितीत आर्मीतील ईमर्जन्सी अटॅकसाठी हे हेलिकॉप्टर तयार केले आहे. 1975 मध्ये अपाचेने पहिले उड्डाण घेतले होते.
पहिल्यांदा 1986 मध्ये अपाचेला अमेरिकन सैन्यात सामील करण्यात आले.
सेन्सरच्या मदतीने शत्रूंना सहज शोधून त्यांचा नायनाट करता येतो. तसेच यामध्ये नाईट व्हिजन सिस्टिमही बसवण्यात आली आहे.
मुख्य लँडिंग गियर दरम्यान 30-मिलीमीटरच्या चेन ग्रुप या हेलिकॉप्टरची धडक क्षमता दुप्पट करते.
हेलिकॉप्टरच्या चारही पंखांवर AGM-114 हेलफायर क्षेपणास्त्र आणि Hydra 70 रॉकेट पॉड्सचा समावेश आहे.
युद्ध अन् लढाईदरम्यान अपयशी ठरणार नाही अशा प्रकारे या अपाचेची मजबूत रचना करण्यात आली आहे.
जगातील कोणत्याही हवामानात किंवा परिस्थितीत शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता असलेले हे हेलिकॉप्टर आहे.
मिनिटाला 889 मीटर वेगाने वर उड्डाण करु शकणाऱ्या या हेलिकॉप्टरचा कमाल वेग 279 किमी/तास आहे.