Indian Army Honours Anna Hazare: भारतीय लष्कराकडून अण्णा हजारेंना 'भीम' रणगाडा गिफ्ट; काय आहे कारण?

Deepak Kulkarni

ओळख

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या दिल्लीतील जंतरमंतरसह विविध आंदोलनं आणि समाजसेवेच्या ध्यासामुळे ओळख मिळाली.

Indian-Army-Gifted-Bhim-Tank-To-Anna-hazare | Sarkarnama

सैन्यात चालक म्हणून सेवा

हजारे यांचं भारतीय सैन्याशी खास नातं राहिलं आहे. त्यांनी सैन्यात चालक म्हणून सेवा बजावली आहे. 

Indian-Army-Gifted-Bhim-Tank-To-Anna-hazare | Sarkarnama

ग्रामविकासाचा नवा पॅटर्न

भारतीय लष्करातील सेवेनंतर त्यांनी समाजसेवेचं व्रत हाती घेत त्यांच्या राळेगणसिद्धी गावाचा सर्वांगीण विकास घडवत आदर्श ग्रामविकासाचा नवा पॅटर्न देशपातळीवर समोर आणला.

Indian-Army-Gifted-Bhim-Tank-To-Anna-hazare | Sarkarnama

विशेष गौरव

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा भारतीय संरक्षण मंत्रालय आणि सैन्यदलाकडून विशेष गौरव करण्यात आला आहे. 

Indian-Army-Gifted-Bhim-Tank-To-Anna-hazare | Sarkarnama

‘भीम’ रणगाडा भेट

देशसेवेसोबतच ग्रामविकासात दिलेल्या योगदानाची दखल घेत हजारे यांना ऐतिहासिक टी-55 म्हणजेच ‘भीम’ रणगाडा भेट देण्यात आला आहे. 

Indian-Army-Gifted-Bhim-Tank-To-Anna-hazare | Sarkarnama

राळेगणसिद्धीत दाखल

हा भीम रणगाडा राळेगणसिद्धीत दाखल झाला आहे. मात्र,हा रणगाडा गावात पोहोचताच अण्णा यांना गहिवरुन आल्याचं दृश्य पाहायला मिळालं.

Indian-Army-Gifted-Bhim-Tank-To-Anna-hazare | Sarkarnama

प्रतीक

राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी रणगाडा गावात पोहोचताच त्याचं अगदी जल्लोषात स्वागत केलं. हा रणगाडा यापुढील काळात अण्णांच्या स्मृती आणि प्रेरणादायी कार्याचं प्रतीक म्हणून जतन करण्यात येणार आहे.

Indian-Army-Gifted-Bhim-Tank-To-Anna-hazare | Sarkarama

हजारेंना गिफ्ट

देशाच्या अनेक महत्त्वाच्या युद्धांमध्ये सहभाग नोंदवलेला भीम रणगाडा लष्कराकडून हजारेंना गिफ्ट देण्यात आला आहे.

Indian-Army-Gifted-Bhim-Tank-To-Anna-hazare | Sarkarnama

अभिमानास्पद

अण्णा हजारे यांनी हा सन्मान केवळ त्यांच्यासाठी नसून राळेगणसिद्धीतील ग्रामस्थ, सैनिक आणि देशसेवेच्या मूल्यांचा गौरव असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच हा क्षण गावासाठी अभिमानास्पद आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचं म्हटलं आहे.

Indian-Army-Gifted-Bhim-Tank-To-Anna-hazare | Sarkarnama

NEXT: विजयाचा मार्ग मोकळा, नाशिक विधानपरिषदेचे उमेदवार नरेंद्र दराडेंची संपत्ती मुलापेक्षाही कमी

Narendra Darade Assets | Sarkarnama
येथे क्लिक करा...