Ganesh Sonawane
नाशिक विधानपरिषद स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची जागा महायुतीत शिवसेना शिंदे पक्षाला सुटली आहे.
माजी आमदार नरेंद्र दराडे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली असून त्यांचा प्रचार सुरु आहे. याआधी या जागेवर तेच आमदार होते
भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने आता दराडेंचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नरेंद्र दराडे यांची जंगम मालमत्ता : तीन कोटी ४२ लाख ३६ हजार ३७४ इतकी आहे.
नरेंद्र दराडे यांची स्थावर मालमत्ता - पाच कोटी ९८ लाख ७६ हजार ६७५ इतकी आहे.
नरेंद्र दराडे यांच्याकडे ७५ ग्रॅम सोनं आहे. तर त्यांच्यावर ७७ लाख ९७ हजार ६४० इतके कर्ज आहे.
नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांच्या नावावर वडिलांपेक्षा अधिक संपत्ती आहे.
जंगम मालमत्ता सहा कोटी २१ लाख ५६ हजार ०९७ इतकी तर,
स्थावर मालमत्ता : दहा कोटी ८८ लाख ७५ हजार ३९५ इतकी आहे. १७५ ग्रॅम दागिने आहेत.