Rashmi Mane
जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद पुन्हा पेटवण्याचा पाकिस्तानचा डाव भारतीय सेनेने हाणून पाडला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्या होत्या.
दहशतवादाला आळा घालण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेने 'ऑपरेशन शिवशक्ती' हे विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्ये एकाच वेळी दोन्ही बाजूंनी दहशतवाद्यांवर जोरदार कारवाई करण्यात आली.
भारतीय लष्कराच्या 'व्हाइट नाईट कॉर्प्स'ने सोशल मीडियावर 'ऑपरेशन शिवशक्ती'च्या यशाची माहिती दिली. भारतीय सैन्याने तात्काळ कारवाई करत नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करणाऱ्या दोन्ही दहशतवाद्यांना ठार मारले आणि त्यांचे नापाक मनसुबे हाणून पाडले.
भारतीय लष्कराने दहशतवाद्यांकडून तीन शस्त्रे जप्त केली आहेत. गुप्तचर युनिट्स आणि जेकेपीकडून मिळालेल्या समन्वित माहितीच्या आधारे ही लष्करी कारवाई यशस्वी झाली.
मागच्याच आठवड्यात 'ऑपरेशन महादेव' अंतर्गत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यांचे संबंध अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी असल्याचे निष्पन्न झाले होते.
या सर्जिकल कारवाईमुळे जम्मू-कश्मीरमध्ये शांततेचा मार्ग अधिक मजबूत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
'ऑपरेशन शिवशक्ती' ही मोहीम दहशतवाद्यांना ठोस इशारा असून, देशाच्या सीमांची सुरक्षा अजिबात कमजोर नाही, हे यातून स्पष्ट झाले आहे.