Deepak Kulkarni
भारतीय सैनिक हा सतत फिल्डवर असतो. ऊन,वारा पाऊस अशा सर्व नैसर्गिक संकटांशी सामना करत आपलं कर्तव्य निभवावं लागतं.
सैनिकांना कर्तव्य पार पाडत असताना कौटुंबिक जबाबदाऱ्याही दुर्लक्षित करता येत नाही. त्यासाठी आई-वडील, पत्नी यांच्याशी संवाद राखण्यासाठी फोन आवश्यक असतो.
भारतीय लष्कराच्या पराक्रमाची चर्चा ही फक्त भारतातच नव्हे,तर जगभरात होत असते.
आता याच भारतीय लष्करानं आपल्या सैनिकांच्या सोशल मीडिया वापर धोरणात महत्वपूर्ण बदल केले आहेत.
आजच्या जमान्यात स्मार्टफोनचं आणि सोशल मीडियाची जगभरात मोठी क्रेझ आहे. याच पार्श्वभूमीवर नव्यानं सैन्यात भरती होत असलेल्या Gen z पिढीलाही सोशल मीडियाचे अफाट आकर्षण आहे.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी एनडीएत प्रवेश घेणाऱ्या कॅडेट्सना फोनशिवायही जगू शकतो हे देण्यासाठी तीन ते सहा महिनं लागत असल्याचंही माहिती दिली.
सैनिकांना आता सोशल मीडियावरच्या कोणत्याही पोस्टला 'लाईक' आणि कमेंट करता येणार नाही. तसेच, सैनिकांना कोणती पोस्टही अपलोड करता येणार नसल्याचं माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्करातील जवान आणि अधिकारी हे केवळ इन्स्टाग्रामचा वापर तेही देखरेख आणि बघण्यासाठीच करू शकणार आहे.
लष्कराच्या सर्व युनिट्स आणि विभागांना सोशल मीडिया वापराबाबतचे हे नवे निर्देश जारी करण्यात आले आहेत.