Jagdish Patil
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
या दहशतवादी हल्ल्याचे हृदय पिळवटून टाकणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
यापैकी एक लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मृतदेहाशेजारी बसलेली त्यांची पत्नी हिमांशी यांचा फोटो व्हायरल होत आहे. या दोघांचं 7 दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं.
विनय नरवाल यांच्यासह दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
यावेळी दहशतवाद्यांनी अनेकांना तुम्ही मुस्लिम आहात का? असा प्रश्न विचारला त्यावर नाही म्हणताच त्यांनी बेछूट गोळीबार केल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
तर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी श्रद्धांजली वाहिली.
यावेळी त्यांनी दहशतीसमोर झुकणार नाही आणि कुणालाही सोडणार नाही, असा इशारा हल्लेखोरांना दिला.