Aslam Shanedivan
बँकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी इंडियन बँकेत मोठी संधी उपलब्ध झाली असून अप्रेंटिस पदांसाठी मेगाभरती जाहीर झाली आहे.
तब्बल १५०० अप्रेंटिस पदांची भरती जाहीर झाली असून अर्ज प्रोसेस ५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू झाली आहे. या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधराला अर्ज करता येणार आहे.
केंद्र सरकारकडून मान्यता असलेली समकक्ष शैक्षणिक पात्रताही ग्राह्य धरली जाणार असून उमेदवाराने १ एप्रिल २०२२ ते १ नोव्हेंबर २०२६ या वर्षात पदवी पूर्ण केलेली असायला हवी.
या भरतीसाठी उमेदवाराचं वय २० वर्षे ते २८ वर्षे असायला हवं . म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ नोव्हेंबर १९९८ पूर्वी आणि १ नोव्हेंबर २००६ नंतर झालेला नसावा.
अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि दिव्यांग उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
या भरतीचा अर्ज NATS 2.0 पोर्टल https://nats.education.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर करता येईल. यावेळी मिळणारा Enrolment ID जपून ठेवावा लागणार आहे.
उमेदवारांनी इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट indianbank.bank.in ला भेट देऊन Recruitment मधील Apprentice Recruitment लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी.
आवश्यक माहिती आणि निर्धारित अर्ज शुल्क भरल्यावर फॉर्म सबमिट करून त्याची पावती डाउनलोड करून ठेवावी.