Rajanand More
देशाच्या प्रशासनामध्ये मागील काही वर्षे केवळ पुरूषांचा वरचष्मा होता. पण आता महिलांनीही आपला दबदबा निर्माण केल्याचे वास्तव आहे.
सिव्हील सेवा परीक्षांमध्ये महिलांचा सहभाग वाढत असल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे. मोदी सरकारनेच बुधवारी लोकसभेत ही माहिती दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी CSE परीक्षेत यश मिळणाऱ्या महिलांची संख्या २०१९ च्या तुलनेत ११ टक्क्यांनी वाढली आहे. ही संख्या २०२३ मध्ये ३५ टक्क्यांवर गेली.
मागील पाच वर्षांत अंतिम मेरिट लिस्टमध्ये अधिकाधिक महिलांचा समावेश होत असल्याचेही आकडेवारीवरून समोर आले आहे. २०२३ मध्ये ११२३ उमेदवारांपैकी ३९७ महिला होत्या.
देशाच्या प्रशासनातील सर्वोच्च सेवांमधील महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत असल्याचे सांगितले.
केवळ महिलांचाच आकडा नव्हे तर प्रशासकीय सेवेत अभियांत्रिकीची शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचा टक्काही लक्षणीय वाढला आहे.
सिव्हील सेवांमध्ये २०२३ मध्ये तब्बल ५५४ अभियांत्रिकी शिक्षण घेतलेले उमेदवारांची निवड झाली. वैद्यकीय़ शिक्षण असलेल्या ७३ उमेदावारांनीही निवडण्यात आले होते.
सिव्हील सेवांच्या परीक्षांमध्ये संशोधकवृत्ती, विश्लेषण करण्याची कुवत असलेल्या उमेदवारांची निवड मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे.