सरकारनामा ब्यूरो
भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. जाणून घेऊयात कोणाला पहिल्यांदा मिळाला होता हा पुरस्कार.
देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 2 डिसेंबर 1954 पासून भारतरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात केली.
भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा या क्षेत्रात योगदान देणाऱ्यांना दिला जातो.
1954 ला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार तीन महापुरुषांना देण्यात आला होता.
स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकटरमण यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
1955 पासून भारतरत्न पुरस्कार मरणोत्तरही दिला जाऊ लागला.
ज्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार दिला जातो. त्या व्यक्तीला भारत सरकारकडून देशासाठी केलेल्या योगदानाची पोचपावती म्हणून प्रमाणपत्र आणि पदक दिले जाते.
2024 यावर्षात भारतरत्न या पुस्काराने भाजपचे नेते लालकृष्ण आडवाणी, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामिनाथन यांना गौरवण्यात आले.