Kirti Azad Birthday: माजी मुख्यमंत्र्यांचा मुलगा, उत्तम क्रिकेटर अन् राजकीय मैदान गाजवणारा नेता...कीर्ती आझाद !

सरकारनामा ब्यूरो

कीर्ती आझाद

1983 क्रिकेट विश्वचषकातील विजयात सामील असलेले, बिहारमधील पूर्णियाचे कीर्ती आझाद हे माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी आहे.

Kirti Azad | Sarkarnama

प्रसिद्ध क्रिकेटपटू

1980 ते 1986 या काळात भारतीय क्रिकेट संघासाठी त्यांनी सात कसोटीआणि 25 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

Kirti Azad | Sarkarnama

शिक्षण

त्यांनी दिल्ली येथील मॉडर्न स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण आणि सेंट स्टीफन्स कॉलेजमधून बी.ए. केले आहे.

Kirti Azad | Sarkarnama

यशस्वी कारकीर्द

आझाद यांनी रणजी ट्रॉफी सामन्यांमध्ये दिल्लीकडून खेळताना देशांतर्गत यशस्वी कारकीर्द गाजवली.

Kirti Azad | Sarkarnama

भागवत झा यांचे पुत्र

आक्रमक उजव्या हाताचे फलंदाज आणि ऑफस्पिनर आझाद झा हे बिहारचे माजी मुख्यमंत्री भागवत झा यांचे पुत्र आहेत.

Kirti Azad | Sarkarnama

राजकारणात प्रवेश

वडिलांच्या पाठोपाठ 2014 मध्ये राजकारणात प्रवेश करत त्यांनी भाजपच्या तिकिटावर बिहारमधील दरभंगा येथून लोकसभा निवडणुकीत निवडून आले.

Kirti Azad | Sarkarnama

काँग्रेसमध्ये प्रवेश

2019 मध्ये काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यानंतर ते 2022 च्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले.

Kirti Azad | Sarkarnama

TMC चे राज्य प्रभारी

गोव्यातील अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे राज्य प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

Kirti Azad | Sarkarnama

चित्रपटात स्वत:ची भूमिका

“किरकेट” या चित्रपटात स्वत:ची भूमिका साकारली आणि “83” या चित्रपटातही त्यांची भूमिका होती.

Kirti Azad | Sarkarnama

Next : नवीन वर्षाची सुरुवात सिद्धिविनायकाच्या दर्शनाने, मुख्यमंत्री शिंदेंच्या कुटुंबाचं देव-देव

येथे क्लिक करा