आयपीएलचा वंडर बॉय रिंकू सिंगने आज सपाच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत विवाह करण्याचा पहिला विधी सोहळा पार पाडला. . क्रिकेटर रिंकू सिंग आणि खासदार प्रिया सरोज यांचा आज लखनौ येथे रिंग सेरेमनी झाला..सपाच्या नेत्या जया बच्चन, अखिलेश यादव, डिंपल यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. . रिंकू हा अलीगढ येथील सामान्य कुटुंबातील असून प्रिया शिक्षित, राजकीय घराणेशाही असलेल्या कुटुंबातील आहे.. दोन वर्षापूर्वी दोघांची ओळख झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, ते लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. . प्रिया या मछलीशहरच्या खासदार आहेत. त्या उत्तरप्रदेशातील सर्वात तरुण खासदार आहेत, त्यांचे वय २७ वर्ष आहे.. प्रिया यांनी भाजपच्या बीपी सरोज यांचा 35 हजार 850 मतांनी पराभव केला होता. .प्रिया यांनी दिल्ली विद्यापीठातून वकीलीची पदवी घेतली आहे. वडील तुफानी सरोज हे माजी खासदार आहेत.. 18 नोव्हेंबर रोजी वाराणसी येथील हॉटेल ताज येथे हा शाही विवाह सोहळा होणार आहे. . दोन्ही कुटुंबियांशी संवाद साधल्यानंतर या लग्नाला परवानगी देण्यात आली, असे तुफानी सरोज म्हणाले..NEXT: ही आहे पाकिस्तानी गुप्तहेरांची 'आका'; 'मॅडम एन' ने 500 युट्यूबरला ओढलं जाळ्यात.येथे क्लिक करा