युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीच्या अटकेनंतर देशात अनेक पाकिस्तानी गुप्तहेरांच्या मुसक्या आवळण्यात येत आहेत. . सुमारे पाच हजार युट्युबरना आपल्या जाळ्यात ओढणारी 'मॅडम एन'सध्या चर्चेत आहे. तिच्याबाबत जाणून घेऊया .लाहोरमध्ये 'ट्रॅव्हल एजन्सी' चालवणाऱ्या पाकिस्तानी बिझनेस वुमन नोशाबा शहजाद हीने ज्योती मल्होत्रासह भारतातील अनेक युट्यूबर्सना मदत केल्याचे आढळले आहे. . पाकिस्तानात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या युट्युबरना तिने मदत केली. त्यानंतर तिनं त्यांचा हेरगिरीसाठी उपयोग केला. . आयएसआयने नोशाबा शहजादचे कोड नेम 'मॅडम एन' ठेवलं आहे. तिचा पती पाकिस्तानी नागरी सेवेतील निवृत्त अधिकारी आहे. 'मॅडम एन'ने भारतात सुमारे ५०० हून अधिक गुप्तहेराचं स्लीपर सेल जाळे तयार केले आहे.. दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात शहजादला सहज प्रवेश मिळत होता. तिला हव्या असलेल्या व्यक्तीला पाकिस्तानचा व्हिसा सहज मिळत होता. . तिच्या एका फोनवर व्हिसा मिळत असे, एवढा तिचा दरारा आहे. त्यातूनच तिनं पाच हजाराहून अधिक भारतीय युट्युबर्सला आपल्या जाळ्यात ओढले आहे. .सहा महिन्यात भारतातील 3 हजार नागरिक आणि दीड हजार अनिवासी भारतीयांना पाकिस्तानात पाठविण्यात तिनं मदत केली होती. .NEXT: आमदारकीची हॅट्रीक, विलासरावांचे मुख्यमंत्रिपद अडचणीत आणणारा माजी आमदार अजितदादांच्या राष्ट्रवादीत .य़ेथे क्लिक करा