Ganesh Sonawane
चलनी नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते.
देशात चार चलनी नोट छापण्याचे प्रेस आणि चार नाण्यांच्या टांकसाळी आहेत.
मध्य प्रदेशातील देवास, महाराष्ट्रातील नाशिक, कर्नाटकातील म्हैसूर आणि पश्चिम बंगालमधील सालबोनी येथे चलनी नोटा छापल्या जातात.
चलनी नोटा तयार करण्यासाठी कापसापासून विशिष्ट पद्धतीने तयार केलेला कागद आणि विशेष शाई वापरली जाते.
या पेपरचा काही भाग महाराष्ट्राच्या नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमध्ये आणि काही भाग मध्य प्रदेशातील होशंगाबाद पेपर मिलमध्ये तयार केला जातो.
काही कागद जपान, ब्रिटन, जर्मनीतूनही आयात केला जातो.
चलनी नोटा छापण्यासाठी लागणारी ऑफसेट शाई मध्य प्रदेशातील देवासच्या बँक नोट प्रेसमध्ये बनविली जाते. तेथून ती आणतात.
चलनी नोटांवर नक्षीदार छपाईची शाई सिक्कीम येथून आणतात.