Aslam Shanedivan
देशात नुकताच लोकसभा आणि विधानसभा पार पडल्या असून निकालानंतर ईलेक्ट्रानिक व्होटिंग मशीनवर (EVM) शंका उपस्थित करण्यात आली होती.
ही शंका अद्याप अनेकांच्या मनात असतानाच अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सने ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित केली आहे. यामुळे देशात एकच खळबळ उडाली आहे.
अमेरिकी राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी EVMमध्ये गंभीर त्रुटी असल्याचा दावा केलाय
तसेच त्यांनी ईव्हीएम हॅक करून निकाल बदलणे शक्य आहे, असा दावाही केला आहे. ज्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.
तर गबार्ड यांच्या दाव्याच्याआधी ईव्हीएम मशीनविषयी टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी देखील गेल्या वर्षी इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रावर प्रश्न उपस्थित केले होते.
मात्र गबार्ड यांचा हा दावा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी खोडून काढताना EVM पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.
तसेच कुमार यांनी EVMमध्ये कोणतीही छेडछाड करता येत नसून काही देशांमध्ये EVMचा वापर सुरू आहे.
तर भारतीतील EVM पीएसयूद्वारे बनवली गेली असून त्यांची कायदेशीर तपासणी झाली आहे. त्याला ब्लूटूथ इंफ्रारेडने नाही जोडता येत. यामुळे ते सुरक्षित आहे.