Rashmi Mane
वंदे भारत एक्सप्रेसने भारतीय रेल्वे प्रवासाला एक नवी दिशा दिली आहे. वेगवान, आरामदायी आणि अत्याधुनिक सुविधा ही तिची खासियत आहे. 2019 पासून सुरू झालेली ही सेवा आज देशभरात सुमारे 150 गाड्यांपर्यंत पोहोचली आहे.
10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंगळुरू–बेलागवी, अमृतसर–श्री माता वैष्णो देवी कटरा, अंजनी (नागपूर)–पुणे या तीन मार्गावर एकाचवेळी तीन नव्या वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
महाराष्ट्रात नागपूर ते पुणे धावणार आहे देशातील ‘Longest’ वंदे भारत एक्सप्रेस जी सुमारे 881 किलोमीटरचा हा प्रवास ही गाडी 12 तासांत पूर्ण करते.
या गाडीचा सरासरी वेग 73 किमी/तास असून ती नागपूर–पुणे दरम्यानची सर्वात वेगवान रेल्वे आहे. आधुनिक इंटेरियर, आरामदायी आसने, वाय-फाय आणि सुरक्षित प्रवास ही या रेल्वेचे वैशिष्ट्य आहे.
ही गाडी मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी व्यावसायिक, विद्यार्थी तसेच पर्यटन क्षेत्रासाठी महत्त्वाची कडी ठरणार आहे.
नागपूर–पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे 10 थांबे असणार आहेत. वर्धा, बदनेरा, अकोला, शेगाव, भुसावळ, जळगाव, मनमाड, कोपरगाव, अहमदनगर आणि दौंड.
(अंजनी) नागपूर येथून सकाळी 9:50 ला सुटते व रात्री 9:50 ला पुण्यात पोहोचते. ही सेवा सोमवार वगळता आठवड्यातील 6 दिवस सुरू राहणार आहे.